युवा संगम ऑनलाईन न्यूज दिं-26सप्टेंबर
कारंजा (घा):-
तालुक्यातील बांगडापूर जंगल परिसरात जनावरे चारायला गेलेल्या गुराख्याचा वाघाच्या हल्ल्यात ठार झाल्याची घटना आज सायंकाळी उघडकीस आली.मृतक उकंडी उर्फ होरेश्वर घसाळ वय-33,असे मृत गुराख्याचे नाव आहे.त्याच्या मागे पत्नी, व मुलगा, मुलगी असा आप्त परिवार आहे.घनदाट जंगलात सध्या वाघ आढळत आहेत. हा गुराखी दररोज जनावरे चरण्यासाठी जात असतो. नेहमी प्रमाणे आजही तो जनावरे चारायला गेला होता. तेव्हा सायंकाळच्या सुमारास हा हल्ला झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या वाघाच्या हल्ल्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. चरायला गेलेले जनावरे घरी परत आले मात्र होरेश्वर हा परत आला नसल्याने. त्याला शोधण्यासाठी गावातील नागरिक जेव्हा गेले. तेव्हा त्या नागरिकांना त्याचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली असून रात्री वनविभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहे.अद्यापही गुराख्याचे मृतदेह जंगल परिसरात असून त्याठिकाणी वन कर्मचारी पोहचले आहे.
कारंजा(घा) तालुक्यात वाघाच्या हल्याच्या घटनेत वाढ
कारंजा(घा) तालुका हा बोर अभयारण्याला लागून असल्याने मोठ्या प्रमाणात वाघाचे या तालुक्यात वावर आहे .दिवसाढवळ्या वाघाचे अनेकांना दर्शन होत असतात. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.यातच तीन वर्षाच्या काळात जवळपास ही सातवी घटना आहे. काही महिन्यांपूर्वी महिलावर वाघाने हल्ला केला. यात एक महिला जागीच मृत्यू झाला तर एक महिला गंभीर जखमी झाली होती.मात्र त्या महिलले अद्यापही पुरेशी मदत मिळाली नाही.यातच आज बांगडापूर येथील गुराखी वाघाच्या हल्ल्यात ठार झाला.या घटनेने गावात आक्रोश निर्माण झाला असून वाघाच्या वाढत्या होणाऱ्या हल्ल्याला वनविभागाने यावर तोडगा काढून नागरिकांचे जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी असून परीसरात तणावाचे वातावरण आहे.