युवा संगम ऑनलाईन न्यूज दिं-24-1-2023
कारंजा(घा)
शहरात गेल्या अनेक महिन्यांपासून कचरा संकलन करणाऱ्या गाड्या बंद आहे. परिणामी, कारंजा शहरातील अनेक भागात कचरा पडून आहे. याची दखल घेत आज कारंजा( घा)येथील जयदादा मित्र परिवाराकडून गावातील कचरा संकलित करण्यासाठी कचरा गाड्या उपलब्ध करून दिल्या आहे. शहरात गेल्या काही महिन्यांपासून कचरा संकलित कंत्राटदाराचा कार्यकाळ संपला आहे. काही महिन्यांपासून नव्याने कचरा संकलन करण्यासाठी निविदा काढण्यात आली असल्याचे सांगण्यात येते. मात्र इतके महिने लोटूनही नगरपंचायतकडून काही उपाययोजना केल्या नसल्याने जयकुमार मित्र परिवाराच्या माध्यमातून कारंजा शहरातील कचरा संकलन करण्यासाठी कचरा गोळा करण्यासाठी तीन गाड्या उपलब्ध करून दिल्या आहे. तीनही गाड्या कारंजा शहरातील १७ ही प्रभागात कचरा संकलन करणारा आहे. करणाऱ्या जय दादा मित्र परिवाराकडून अनेक
सामाजिक काम कारंजा शहरासह तालुक्यात सुरू आहे. आज शहरातील कचरा गोळा करण्यासाठी जयकुमार बेलखडे यांनी स्वखर्चाने शहर स्वच्छ ठेवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. उड्डाणपुलाच्या खाली कचरा गाड्यांचे पूजन करून कचरा संकलन गाडी सुरू झाले आहे. यावेळी जयकुमार बेलखडे, गजानन मांडवेकर, अमोल चरडे, संदीप भिसे, मिथूनसिंग बावरी, सतीश मानमोडे, अविनाश शिंदे, पंकज चाफले, शंकर भांगे, नौशाद सौदागर उपस्थित होते.