कारंजात १९२ कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त

कारंजात १९२ कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त

•कारखाना उद्ध्वस्त तीन जणांना अटक •डीआरआयची कारवाई
 10/12/2025
युवा संगम न्यूज 
कारंजा (घा):-
शहरातील शेकापूर 
(भादे ले आऊट)परिसरात 
महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) वर्धा जिल्हयातील कारंजा येथे एका बेकायदेशीर मेफेड्रोन उत्पादन युनिटचा पर्दाफाश करीत १९२ कोटी रुपये मूल्याचे १२८ किलो मादकपदार्थ जप्त केला, अशी माहिती अधिकाऱ्यांनी मंगळवारी दिली.
रविवारी आणि सोमवारी केलेल्या या कारवाईत तीन जणांना अटक करण्यात आली. यात सूत्रधाराचा समावेश असून, तो पैशांचा पुरवठा आणि केमिस्ट म्हणूनही काम करीत होता. प्राप्त झालेल्या गुप्तचर माहितीच्या आधारे
डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी 'ऑपरेशन हिंटरलॅण्ड ब्यू' नावाची मोहीम हाती घेतली. त्या अंतर्गत वर्धेपासून ६० किमी अंतरावर असलेल्या कारंजा (घाडगे) येथे कारवाई करण्यात आली.
अधिकाऱ्यांनी झाडी असलेल्या भागात एका तात्पुरत्या सुविधेवर छापेमारी केली. तिथे पूर्णपणे कार्यरत असलेले मादकपदार्थाचा कारखाना आढळला, असे अधिकाऱ्याने सांगितले. या कारवाईदरम्यान सिंडिकेटच्या कथित सूत्रधारासह तीन जणांना अटक करण्यात आली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
•कच्चा मालही जप्त
उच्च दर्जाच्या १२८ किलो मेफेड्रोनसोबतच २४५ किलो रसायने, कच्चा माल, रिअॅक्टर, भांडी, मादकपदार्थ निर्मितीसाठी लागणारी उपकरणे जप्त करण्यात आली, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
अटक केलेले आरोपी 
मेफेड्रोनची निर्मिती आणि वितरणात सहभागी होते. त्यांना एनडीपीएस कायद्याच्या संबंधित तरतुदींनुसार अटक करण्यात आली. या प्रकरणी तपास सुरू आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.
Yuva Sangam News

Malhar Advt

Yuva Sangam News