युवा संगम,ऑनलाईन न्यूज दिं-7नोव्हेंबर2022
आष्टी(शहीद)तालुक्यातील लहान आर्वी येथील नवयुवक कल्याण सेवाश्रम संस्था, मातृसेवा समिती आणि सावता परीषदेचे अध्यक्ष सर्पमित्र तथा सामाजिक कार्यकर्ते प्रितम ऊर्फ सत्यम रामप्रकाश गायकी यांच्या वाढदिवसानिमित्ताचे औचित्य साधुन रक्तदान शिबिर व आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. शिबिराला अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालय ( इर्वीन हाॅस्पीटल) ची ररक्त संकलन पेढी बोलावण्यात आली होती. तसेच आरोग्य तपासणी शिबिराकरिता अंतोरा प्राथमिक आरोग्य केंद्र येथील डॉक्टरांची चमू बोलाविण्यात आली होती. रक्तदान शिबिराकरिता लहान आर्वी सह परीसरातील एकुण २७ रक्तदात्यांनी रक्तदान केले. तर १५० रुग्नांनी आपल्या आरोग्याची आरोग्य तपासणी करून घेतली. आरोग्य तपासणी मध्ये सी. बी. सी. , बी.पी. , शुगर , थायरॉईड तसेच एच. आय. व्ही. तपासणी करण्यात आली.
शिबिराचे उदघाटन लहान आर्वी येथील युवा समाज सेवक श्री. अतुलभाऊ होले गुरूजी यांच्या हस्ते फोटोचे पूजन करून शिबिराचे उदघाटन करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून आष्टी पोलीस स्टेशन येथील समुपदेशक उज्वला वैद्य, विनायक भांगे, लहान आर्वी जि. प. शाळेचे विषय शिक्षक मोहन खारकर , प्रतिष्ठीत नागरीक धनराज राठी, कमलाकर जी निंभोरकर आदी उपस्थित होते.
शिबिरामध्ये लहान आर्वी येथील अलोपॅथीक दवाखान्याचे वैद्यकीय अधिकारी डाॅ.दिपक वाघमारे , कर्मचारी सुरेंद्र ढोक, आरोग्य सेविका कु. अपेक्षा शिरभाते,कु.संगिता मेश्राम,कु.आश्वीनी केंन्द्रे, डाटा एन्ट्री आपरेटर सुरज शेळके, आरोग्यदुत अनिल मुकरदम, आशा गटप्रवर्तक सौ. रोशनी राऊत,लहान आर्वी येथिल आशावर्कर सौ. अर्चना उर्फ आशा डेहनकर आणि लिंगापुर येथील आशा वर्कर सौ. मंगला भिवापुरे ,बचत गटाच्या सीआरपी सौ. वनिता साबळे , सौ. निलीमा देशमुख, पुनम राऊत,क्रुषी सखी सौ. रेखा आकोलकर यांचेसह गावातील रक्तदात्यांनी शिबिरात सहभाग नोंदविला तसेच गावातील सामाजिक कार्यकर्ते चा मोठ्या प्रमाणात सहभाग होता.सर्व गावकऱ्यांच्या सहकार्याने शिबिर उत्साहात पार पडले.