वातावरणातील बदल थांबवा, झाडे लावा झाडे जगवा

वातावरणातील बदल थांबवा, झाडे लावा झाडे जगवा 
अमरावतीमधील कृषी दुतांनी घेतली दखल कृषी दिनानिमित्ताने केलं वृक्षारोपण
●युवा संगम(साप्ताहिक),ऑनलाईन न्यूज
 24 जुलै 2024
अमरावती:-
 माहुली जहागिर
 येथे स्व. वसंतराव नाईक यांच्या १११ व्या स्मृतीदिनानिमित्त व महाराष्ट्र कृषि दिनाचे औचित्य साधून  श्री.शिवाजी कृषि महाविद्यालयाचे विद्यार्थ्यांनी गावात विविध ठिकानी  वृक्षारोपण केले.
वातावरणात सातत्याने बदल होत आहे.त्यामुळे पर्यावरणाचा समतोल ढासळतो आहे. पर्यावरणाचा प्रश्न सर्व जगाला भेडसावत आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण व त्यांचे संवर्धन ही आजच्या काळाची  गरज आहे. म्हणून वृक्षारोपण झालेच पाहिजे सोबतच त्यांच्या संगोपनाची दखल सुध्दा घ्यायला हवी.
वृक्षारोपणा करिता  उपस्थित अमोल पाचघरे व विनायक पाचघरे तसेच  कृषिमीत्र रुशिकेष सपकाल, मोबशिर्र मलिक, सुदर्शन राठोड, कौशल जसुतकर, शुभम राजपूत, व प्रथमेश ढोले इ. उपस्थित होते.
Yuva Sangam News

Malhar Advt

Yuva Sangam News