युवा संगम ऑनलाईन न्यूज दिं-9-9-2024
कारंजा घा:-
शहर व तालुक्यात प्रथमच सुदीप भांगे व मित्र परिवार यांच्या वतीने रुग्ण साहित्य सेवा सुरू करण्यात आली. अल्पावधीतच अनेक रुग्णाणी या निशुल्क सेवेचा लाभ घेतला. तात्पुरते आलेले अपंगत्व करिता साहित्य वापरा आणि वापस करा. यामध्ये सुसज्य पोर्टेबल बेड ,व्हील चेअर देण्यात आली. या साहित्या मुळे आलेले अपंगत्व जाणवत नसल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. यावेळी सुदीप भांगे यांनी घरी जाऊन भेट देत आस्थेने विचारपूस केली. व काही वैद्यकीय मदत लागल्यास देण्याचा मानस व्यक्त केला. यावेळी संजय कदम ,चेतनकुमार काळे उपस्थित होते.