मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान 
•आमदार सुमितवानखेडे   यांची उपस्थिती 
युवा संगम न्यूज,
23/07/2025
कारंजा (घा): येथे मन्नालाल मातादीन सभागृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवस निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोठ्या प्रमाणात रक्तदान करण्यात आले.
 वाढदिवशी पैशांचा अपव्यय टाळून वैद्यकीय व जनहितार्थ लोकोपयोगी उपक्रम राबवण्याचे आवाहन करण्यात आले होते.

या प्रेरणेतून आर्वी विधानसभा क्षेत्राचे आमदार सुमित वानखेडे यांनी मतदारसंघात रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, वैद्यकीय तपासणी शिबिर अशा जनसेवक उपक्रमांचे आयोजन करून मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला.
त्याचाच एक भाग म्हणून, मन्नालाल मातादीन सभागृह, कारंजा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिराचे उद्घाटन आमदार सुमित वानखेडे यांच्या हस्ते झाले.
प्रमुख पाहुणे म्हणून विजय वाजपेयी, चक्रधर डोंगरे, रेवता धोटे, निता गजाम, सुरेश खवशी, रंजना टिपले, जगदीश डोळे, पुष्पा चरडे, रमा दुर्गे, वैशाली सरोदे, योगिता कदम, उषा चौहाण, दिलीप जसुतकर, प्रेम महिले आणि अभियानाचे संयोजक देवेंद्र नासरे यांची उपस्थिती होती.
‘अमन ब्लड बँक, नागपूर’ यांच्या सहकार्याने आयोजित या शिबिरात एकूण ४५ रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले.
शिबिराची सुरुवात श्रीमती रोशनी रोशन ढबाले यांच्या रक्तदानाने झाली, हे विशेष.
या प्रसंगी आमदार सुमित वानखेडे यांनी उपस्थितांना रक्तदानाचे महत्त्व पटवून दिले. आणि आपल्या गुरुस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा दिल्या.
या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी भाजपा कारंजा तालुकाचे नेते, पदाधिकारी,बूथप्रमुख, शक्तिकेंद्र प्रमुख आणि कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
शिबिराच्या उद्घाटन समारंभाचे संचालन व आभार प्रदर्शन प्रेमराज कीनकर यांनी केले.
Yuva Sangam News

Malhar Advt

Yuva Sangam News