कारंजा मोती बिंदू शिबिर, आमदार वानखेडेंचे कौतुकाचा वर्षाव

कारंजा मोती बिंदू शिबिर, आमदार वानखेडेंचे कौतुकाचा वर्षाव
•युवा संगम न्यूज 3/8/2025
कारंजा(घा):- 
शहरातील राजयोग सभागृहात आज मोतीबिंदू शिबीर पार पडला.सध्या  नागरिकात डोळ्यांचे आजारसह इतर आजार प्रमाण वाढले आहे.राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त पालकमंत्री पंकज भोयर यांच्या प्रयत्नातून  जिल्हा  पूर्णपणे मोतीबिंदू मुक्त करण्याचा संकल्प केला आहे.यानिमित्ताने आर्वी मतदारसंघाचे आमदार सुमित वानखेडे यांनी त्यांच्या मतदारसंघातील कारंजा येथे आज मोतीबिंदू शिबिराचे आयोजन केले.या शिबिरात तीन हजार 158 रुग्णांनी उपचार घेतले.यातून रुग्णांना चष्मा मोफत देण्यात आला तर काही रुग्णांना डोळेचे ऑपरेशन मोफत केले जाणार आहे.या कार्यक्रमाचे उद्घाटक पालकमंत्री डॉ.पंकज भोयर ,आमदार दादाराव केचे ,आमदार सुमित वानखेडे, मुख्य कार्यकारी पराग सोमण, जि.प.माजी अध्यक्षा सरिता गाखरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुमत वाघ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. स्वप्निल बेले ,जिल्हा नियोजन अधिकारी उपविभागीय अधिकारी विश्वास शिरसाट , तहसीदार  मोहने मॅडम, माजी अध्यक्ष भाजपा सुनील गपाट,निलेश पोहेकर,विजय बाजपेयी यासह इतर भाजप पदाधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जन्मदिवसापासून सुरु झालेल्या मोतिबिंदू विरहीत अभियानास सर्वसामान्य गोरगरीब नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे. हजारो रुग्ण नोंदणी करुन शिबिराचा लाभ घेत आहे. आर्वी आणि आज कारंजा येथे आ.सुमित वानखेडे यांच्या नेतृत्वात अतिशय उत्तमपणे शिबिर घेण्यात आले. गावोगावी आशा, अंगणवाडी सेविका यांनी जनजागृती केली, रुग्णांना शिबिरस्थळापर्यंत आणून त्यांना लाभ मिळवून देण्याचे मोलाचे काम केले आहे, असे गौरवोद्गार पालकमंत्र्यांनी काढले.
•कारंज्यात ५ बेडचे डायलिसिस सेंटर - आ‌.सुमित वानखेडे*
डायलिसिसची सुविधा उपलब्ध नसल्याने कारंजा व परिसरातील रुग्णांना नागपूर, अमरावती जावे लागते. रुग्णांची ही अडचण सोडवण्यासाठी आता कारंजा येथील ग्रामीण रुग्णालयातच ५ बेडचे डायलिसिस सेंटर सुरु करण्यात आले असल्याचे आ.वानखेडे यांनी सांगितले. पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी केलेला मोतिबिंदू मुक्त जिल्ह्याचा संकल्प यशस्वी होईल. कारंज्यातील पाणी टंचाई दुर करण्यात यश आले. कारंजा आकांक्षित तालुक्याने केलेल्या उत्कृष्ट कामासाठी केंद्र शासनाकडून पारितोषिक प्राप्त झाले. पुढे निती आयोगाच्या सूचनेनुसार सर्वच बाबींवर तालुक्यात चांगले काम होईल. मोतिबिंदू अभियानाचे जिल्ह्यात चांगले काम होत आहे. शासन या अभियानाची दखल घेईल, असे आ.वानखेडे म्हणाले.
•तपासणीसाठी तज्ञ डॉक्टरांचे ४१ पथके
सुरुवातीस पालकमंत्र्यांनी फित कापून शिबिराचे उद्घाटन केले‌. त्यानंतर त्यांनी दालनांना भेट देऊन रुग्ण तपासणीची पाहणी केली. शिबिरस्थळी नोंदणी, रुग्ण तपासणी, औषधे, चश्मे वितरण आदींसाठी तज्ञ डॉक्टरांच्या नेतृत्वात ४१ पथके नेमण्यात आली होती. सकाळी नोंदणीस सुरुवात झाल्यानंतर त्यात्या पथकांनी रुग्णांची तपासणी केली.

•शेतकऱ्यांच्या कुटुंबियास ४ लाखाचा धनादेश
यावेळी पालकमंत्री व अन्य मान्यवरांच्या हस्ते पुरात वाहून मृत झालेल्या प्रफुल्ल दत्तू शेंदरे या शेतकऱ्याच्या कुटुंबियांना ४ लक्ष रुपयांचा धनादेश देण्यात आला. दिव्यांग विद्यार्थ्यांना किसान विकास पत्र तसेच रुग्णांना चश्मे वाटप करण्यात आले. कारंजा आकांक्षित तालुक्यात उत्कृष्ट कामासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांना गौरव करण्यात आला. अवयवदानाचा संकल्प केल्याबाबत राजेंद्र दिवाकर सोनारे व मधुकर नामदेवराव हिंगवे यांचा तर कार्यक्रमस्थळी उत्कृष्ट रांगोळी काढल्याबद्दल आरती सरोदे यांचा सत्कार करण्यात आला.

•शिबिरस्थळी उमेदच्या बचतगटाचे प्रदर्शन
शिबिरस्थळी उमेदच्या महिला बचतगटाद्वारे उत्पादीत वस्तूंचे विक्री व प्रदर्शन लावण्यात आले होते. या प्रदर्शनीचे उद्घाटन पालकमंत्र्यांनी केले. प्रदर्शनीत विविध गटांचे २२ स्टाॅल लावण्यात आले होते. पालकमंत्री पंकज भोयर, आमदार सुमित वानखेडे प्रदर्शनीची पाहणी केली व गटाच्या महिलांशी संवाद साधला.
पालकमंत्र्यांसह ,आमदार सुमित वानखेडे रक्तदाब तपासणी
  आज मोतीबिंदू शिबिरात वर्ध्याचे पालकमंत्री पंकज भोयर यांच्यासह आमदार सुमित वानखेडे यांनी रक्तदाब तपासणी केली.
नोंदणी रुग्ण 3151
नेत्र तपासणी 2669
नेत्र तपासणी सर्जरी 345
चष्मे वाटप 1443
कार्यक्रमाचे संचालन पवन ठाकरे यांनी केले. तर प्रास्ताविक जी. प. मुख्याधिकारी श्री.पराग सोमन , तर आभार गटविकास अधिकारी श्री.प्रवीण देशमुख यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीते करीता सर्व भाजपा नेते,कार्यकर्ते, पदाधिकारी, यांनी परिश्रम घेतले.
Yuva Sangam News

Malhar Advt

Yuva Sangam News