•पत्रकार परिषदेत भाजपचे नेते सुनिल गफाट यांनी दिली माहिती, कार्यकरणीत सर्व घटकातील कार्यकर्त्याचा समावेश
युवा संगम न्यूज 8/8/2025
कारंजा ( घा ):
आर्वी मतदारसंघाचे लोकाभिमुख आमदार श्री.सुमित वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली आज कारंजा येथील भाकरे महाराज सभागृहात तालुका भाजप कार्यकारणी घोषणा करण्यात आली.यावेळी पत्रकार परिषदेमध्ये भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष सुनिल गफाट यांच्या अध्यक्षतेखाली व भाजपा तालुकाध्यक्ष चक्रधर डोंगरे, माजी जिल्हा परिषद सभापती निता ताई गजाम , भाजपा जिल्हा उपाध्यक्ष शिरीष भांगे, रेवताताई धोटे , सुरेश खवशी, प्रमोद चव्हाण, दिलीप जसुतकर, जगदीश डोळे, दिलीप जसुतकर, यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपा कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली.
सविस्तर वृत्त असे की दिनांक ७ ऑगस्ट २०२५ ला कारंजा येथील भाकरे महाराज सभागृहामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती .या पत्रकार परिषदेत कारंजा तालुक्याची कार्यकारणी घोषित करण्यात आली. प्रदेश भाजपाच्या निर्देशानुसार या कार्यकारणी मध्ये कारंजा तालुक्यातील एकूण ९१ सदस्यांच समावेश असून ५ उपाध्यक्ष, २ महामंत्री, ६ चिटणीस, १ कोषाध्यक्ष, विविध मोर्चाचे 7 अध्यक्ष २६ सेल प्रकोष्ट संयोजक, १५ कार्यकारणी सदस्य निवड केली आहे. या कार्यकारणी मध्ये अनुसूचित जाती ,अनुसूचित जमाती तसेच महिलांचा समावेश आहे. या कार्यकारणी मध्ये कायम निमंत्रित व विशेष निमंत्रित सदस्य म्हणून ९१ कार्यकर्त्यांचा समावेश आहे. ही कार्यकारणी करताना तालुक्यातील ५९ ग्रामपंचायत मधील ८२ गावे व समाजातील सर्व घटकांना स्थान देण्यात आले आहे. सदर कार्यकारणी मध्ये कारंजा तालुका अध्यक्ष चक्रधर डोंगरे, कोषाध्यक्ष प्रेमराज किनकर, उपाध्यक्ष हनुमंतराव पठाडे, प्रमोद चव्हाण, प्रविण श्रीराव , मोहन खवशी, शशिभुषण कामडी , सौ.सिमा दुपारे तसेच सरचिटणीस भुपेश बारंगे व दिलीप जसुतकर यांची वर्णी लागली आहे.सोबत चिटणीस पदावर सुनिल वंजारी , अमोल घागरे, सौ सुनिता परतेती , योगिता मानमोडे , रेखा रिठे, विलास घागरे तसेच महिला मोर्चाच्या अध्यक्षपदी सौ रंजना टिपले , व युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी लिलाधर डिग्रसे , किसान मोर्चाच्या अध्यक्षपदी भारत कोरडे, ओबीसी मोर्चा अध्यक्षपदी पवन बोडखे , अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्षपदी रंजीत बागडे, आदिवासी मोर्चा मोर्चा अध्यक्षपदी संतोष कुंभरे, अल्पसंख्यांक मोर्चा अध्यक्षपदी शेख निसार शेख नाजु तसेच सोशल मीडियावर पदावर धिरज कसारे यांची निवड केली आहे. भाजपच्या कार्यकारणी नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे .युवा पिढीला भविष्यात पक्ष वाढीसाठी युवकांची मदत होणार असल्याने भाजप कार्यकारणी मध्ये युवकांना संधी दिली आहे.आमदार सुमित वानखेडे यांचे दूरदृष्टीने भाजपचे कार्यकारणी गठीत झाल्याचे बोलले जात आहे.या बैठकीला मोठ्या संख्येने भाजपचे तालुक्यातील नेते पदाधिकारी उपस्थित होते.
•चार जि.प व आठ प.स सर्कल प्रमुख पदावर नियुक्ती
कारंजा तालुका मंडळातील जिल्हा परिषद कन्नमवार ग्राम सर्कल प्रमुख विजय गाखरे, पं.सं.हेटीकुडी सहप्रमुख भुपेश बारंगे, पं.स. सहप्रमुख संदीप चोपडे , जि.प. सिंदीविहिरी प्रमुख हरीभाऊ धोटे , पं.स. सेलगाव सहप्रमुख रोषण चौधरी, पं.स.सिदिविहिरी सहप्रमुख जगदीश डोळे, जि.प. ठाणेगाव प्रमुख निताताई गजाम, पं.स. नारा सहप्रमुख शशिभुषण कामडी, पं.स. ठाणेगाव देवेंद्र नासरे, जि.प. पारडी प्रमुख सुरेश खवशी , पं.स. पारडी सहप्रमुख प्रविण श्रीराव , पं.स. सहप्रमुख विजय मानमोडे, यांच्यासह इतर कार्यकारणीतील सदस्य पदी निवड करण्यात आली.