नमो उद्यान वॉर्ड क्र.16मध्ये बनवा

नमो उद्यान वॉर्ड क्र.16मध्ये बनवा 
•स्थानिक रहिवाशी नागरिकांची मागणी
•सर्व्हिस रोड, लगत मोक्याच्या ठिकाणी जागा उपलब्ध.
युवा संगम न्यूज,20/9/2025
कारंजा (घा).
भारत देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी 
यांच्या जन्म दिवसाचे अवचित्य साधुन
‘‘वैशिष्ट्यपुर्ण‘‘ योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील सर्व नगरपरिषद/नगरपंचायत क्षेत्रात ‘‘नमो उद्यान‘‘ विकसित करणयासाठी १ कोटीचा नीधी उपलब्ध करून   ‘‘जीआर‘‘ (GR) निर्गमीत केला. या निधी च्या माध्यमातून नमो उद्यान सुसज्ज तयार होणार आहे. त्या करिता वॉर्ड नं.16 मधील सर्व्हिस रोड ला लागून,खुशी हॉटेल जवळ , ही जागा सर्वांच्या सोयीने  मोक्याच्या ठिकाणी उपलब्ध आहे. करिता या जागेवर नमो उद्यान, या ठिकाणी बनवावे अशी स्थानिक वॉर्ड नं.16 च्या रहिवाशी नागरिकांची मागणी आहे.
Yuva Sangam News

Malhar Advt

Yuva Sangam News