•शेतकऱ्यांचे तहसीलदार व कृषी विभागाला निवेदन
युवा संगम न्यूज, 13/9/2025
कारंजा घा:
तालुक्यातील शेतकरी सोयाबीन पिकाचे उत्पन्न घेतले जाते.शेतकऱ्यांसाठी नगदी पिकं असलेल सोयाबीन पिकं हे अत्यंत लाभदायक ठरलेलं वरदान होत.? मात्र काही वर्षांपासून सोयाबीन पिकां दरवर्षी मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यावर्षी हातातोंडांशी आलेला घास हिरवला गेल्याने शेतकरी चिंतेत पडला आहे. सोयाबीन पिकांवर येलो मोझक आणि अतिवृष्टी सोयाबिन पिकांना शेंगा न आल्याने पूर्णतः सोयाबीन पिकं नुकसान झाले आहे. त्यामुळे आज तहसील कार्यालयात आज नायब तहसीलदार टिपरे यांना निवेदन देऊन सोयाबीन पिकांचे पंचनामे करून तातडीने मदत करण्याची मागणी यावेळी केली.यावेळी रामचंद्र घागरे,सुरेश घागरे, योगेश दलाल, हेमराज देवासे, निलेश ढोबाळे, राजेंद्र पठाडे, देविदास कडवे, श्रीराम ढोबाळे, तुकाराम कडवे, मनोहर ढोबाळे,विशाल घागरे, गौरव पांढूरकर उपस्थित होते.