युवा संगम ऑनलाइन न्यूज,15/9/2025
कारंजा (घा).
सोयाबीन पिकावर आलेल्या येलो मोझ्याक, तांबेरा, वायरस या रोगामुळे सोयाबीन नुकसान झाले. त्यामुळे नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई व सरकारने कर्जमाफी द्यावी. व
HTBT कापूस वाणाला केंद्रशासनाने मान्यता द्यावी.
व शेती विषयक रासायनिक औषधावर
केंद्र शासनाने 0%GST करणेबाबत
या प्रमुख मागणी करिता शेतकरी संघर्ष समिती कारंजा(घा) तालुक्याच्या कडून दी.15 सप्टेंबर ला तहसीलदार कारंजा (घा).यांना निवेदन देण्यात आलेले असून तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांची सोयाबीन मोठया प्रमाणात पिवळे पडले असल्यामुळे तसेच खोडकिल, तांबेरा, अळीचा मोठा प्रादुर्भाव असल्यामुळे शेतकऱ्यांचा तोंड चा घास हिरवला त्यामुळे सोयाबीन चे पंचनामे करून नुकसान भरपाई शासनाने द्यावी ही मागणी केली.
शेतकऱ्यावर कर्जाचा डोंगर असल्यामुळे व शेतकऱ्यांना 3 ते 4 वर्षा पासून सतत नापिकी मुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे. निवेदन देते वेळी हेमंत ढोले, अशोक पालिवाल, गोपाळ घाडगे, राजू जोरे,टिकाराम घागरे, किशोर भांगे, विभाकर ढोले, टिकाराम चौधरी ,जयसिंग घाडगे, सुभाष अंधार,मिलिंद कडवे, विशाल नासरे, किशोरधोटे, सुरेश घागरे,राजू चौहान, नरेश डोळे, मंगेश डोबले, रामेश्वर धारपुरे , योगेश घागरे, पांडुरंग कडवे, मयूरजी ढोले, मंगेश खवशी माजी सभापती प. स.व सर्व शेतकरी संघर्ष समितीचे सदस्य उपस्थित होते.