युवा संगम न्यूज 17/9/2025
कारंजा(घा):
शहरातील नागरिकांना दररोज दुर्गंधी, आजारपण व अस्वच्छतेचा सामना करावा लागत असल्याने शहरातील कचरा डेपो दुसरीकडे हटविण्याची मागणी केली आहे. या गंभीर समस्याचे निवेदन न. पं. मुख्याधिकारी यांना प्रेम महिले माजी उपसभापती, आणि निलेश मस्की माजी ग्रामपंचायत सदस्य ,यांनी कचरा डेपो हटविण्यासाठी निवेदन दिले.
सध्या शहरातील वस्ती भागाजवळ असलेल्या कचरा डेपोमुळे नागरिकांना डास, माशा, दुर्गंधी आणि विविध संसर्गजन्य आजारांचा धोका वाढला आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर त्याचा गंभीर परिणाम होत आहे.
निवेदनाद्वारे तात्काळ उपाययोजना कराव्यात व कचरा डेपो योग्य ठिकाणी हलविण्याची कार्यवाही पुढील १५ दिवसांत करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा आम्हाला आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
नगर पंचायतीचे मुख्याधिकारी यांनी निवेदन स्वीकारून योग्य तो निर्णय लवकरच घेण्यात येईल, असे आश्वासन दिले.