युवा संगम न्यूज 27/9/2025
कारंजा (घा):-
सामाजिक समरसता, महिलांचे स्नेहमिलन व त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळण्याकरीता कारंजा शहरात प्रथमच नवरात्रीच्या पावन पर्वावर भोयर,पवार समाज भवन, कारंजा येथे कुलदेवी माता गढकालिका जागर निमित्त गरबा उत्सव उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटन सरिता व गाखरे यांचे हस्ते कुलदेवी व चक्रवर्ती राजा भोज यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाले.
याप्रसंगी प्रमुख अतिथी स्थानी भोयर,पवार विद्यार्थी मंडळाचे अध्यक्ष हेमंतजी ढोले, महिला अध्यक्षा इंदिरा कालबूत, योगिता खवशी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन संगीता भादे कामडी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता सर्व युवती व महिलांनी उस्फूर्तपणे सहकार्य केले व स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.