कचरा बायोमायनिंग करिता 1 कोटी ला मान्यता-दर्यापूरकर

कचरा बायोमायनिंग करिता 1 कोटी ला मान्यता-दर्यापूरकर 
•कारंजा (घा) येथील कचरा प्रश्न मार्गी 
युवा संगम न्यूज 18/10/2025
कारंजा (घा):-
येथील बहुचर्चित कचरा प्रश्न मार्गी लागला असून 
कचऱ्याचे स्थलांतरीत करणे, व त्याचे बायोमायनिंग करणे या करिता स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत, प्रस्तावांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. या मध्ये 17, 754 मे. टन कचरा उचलून बिहाडी रोड  डंपिंग यार्ड मध्ये जमा करून त्यावर प्रकिया करण्यात येणार आहे. या सर्व कामांकरिता 1
कोटी निधी, खासदार. श्रीकांत शिंदे यांनी उपलब्ध करून  दिला.या  कचरा डेपो कामाचे लवकरच काम सुरू होणार असल्याची माहिती आर्वी विधानसभा शिवसेना नेते (शिंदे गट) नितीन दर्यापूरकर यांनी दिली. या निधी उपलब्ध करिता आर्वी मतदार संघाचे आमदार सुमित वानखेडे व किरण पांडव यांचे विशेष सहकार्य लाभले. असल्याची माहिती दर्यापूरकर यांनी दिली. व आभार मानले.
Yuva Sangam News

Malhar Advt

Yuva Sangam News