युवा संगम न्यूज 2/10/2025
कारंजा(घा) : जिल्हा क्रीडा कार्यालय, वर्धा यांच्या वतीने आयोजित 14 वर्षाखालील शालेय क्रीडा स्पर्धांतील हॉलिबॉल स्पर्धा नुकतीच वर्धा येथे पार पडली. या स्पर्धेत सनशाईन स्कूल, कारंजा ची चमू उपविजेती ठरली.
या स्पर्धेतून शाळेचा विद्यार्थी आर्यन भांगे याची गडचिरोली येथे होणाऱ्या विभागीय ट्रायलसाठी निवड झाली.
खेळाडूंना घडविण्यासाठी प्रशिक्षक व शाळेचे पर्यवेक्षक पवन ठाकरे तसेच अकॅडेमीक हेड हेमंत बन्नगरे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
विजयी विद्यार्थी चे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
या विजयी चमूमध्ये वीर कावडकर,समर्थ दर्यापूरकर,आर्यन भांगे,मयांक राऊत,तन्मय सावरकर,नैतिक ढोके, प्रयास इंगळे,शिवम शेंदूरकर या खेळाडूंचा सहभाग होता.
सनशाईन स्कूलच्या विजयी चमूचे अभिनंदन करताना गटशिक्षणाधिकारी पं.स. कारंजा वीणा धावडे मॅडम, संस्थाध्यक्ष प्रेम महिले व सचिव विजय ठाकरे यांनी यशस्वी खेळाडू व प्रशिक्षकांचे कौतुक केले.