युवा संगम न्यूज
कारंजा घा
आज दिनांक 8/10/2025 रोजी दुपारी 3.30 वाजता चक्रवर्ती राजा भोज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कारंजा घाडगे जि. वर्धा येथे अल्पकालीन रोजगारक्षम कार्यक्रम (STEP) आयोजित करण्यात आलेला होता.
या कार्यक्रमात प्रायव्हेट आयटीआय शासकीय आयटीआय महाविद्यालये आणि टेक्निकल हायस्कूल मधील शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून भूपेश बारंगे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती कारंजा घाडगे हे उपस्थित होते.नगर पंचायत उपाध्यक्ष भगवान बोवाडे,प्रमुख पाहुणे रामचंद्र लाटकर, टिकाराम घागरे, प्रेम महिल्ले, जनार्दन धोटे, धीरज कसारे सौ. ज्योती ताई यावले , विलास वानखेडे,रोशन मानमोडे यांनी प्रमुख उपस्थिती होती. सोबतच चक्रवर्ती राजा भोज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे सर्वसाधारण प्राचार्य संतोष कृष्णापुरकर व संस्थेचे सर्व शिल्पनिदेशक आणि विद्यार्थी या कार्यक्रमास उपस्थित होते.
विश्वकर्मा योजनेचे लाभार्थी रामचंद्र लाटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांच्या हस्ते अल्पमुदतीचे अभ्यासक्रमाचे उद्घाटन करण्यात आले, कार्यक्रमाचे संचालन डांगोरे सर यांनी केले कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख पाहुण्यांच्या परवानगीने दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. नंतर अध्यक्षांचे व प्रमुख पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले व कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
या कार्यक्रमात अध्यक्षांनी व प्रमुख पाहुण्यांनी अल्पकालीन रोजगार क्षम कार्यक्रम व शॉर्ट टर्म कोर्सेस बद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली व वेगवेगळ्या शॉर्ट टर्म कोर्सेस बद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कौशल्य ही काळाची गरज आहे व कौशल्य असेल तरच कौतुक होईल असे बोलून विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवले व त्यांना प्रोत्साहित केले. आजचा काळ हा कौशल्याचा काळ आहे जगभरात रोजगार आणि उद्योग यांचे स्वरूप झपाट्याने बदलत आहे पारंपारिक शिक्षणासोबत तांत्रिक कौशल्य (Technical Skills) आणि व्यवहारी अनुभव (Practical Exposure) यांना अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे अशा परिस्थितीत शॉर्ट टर्म कोर्सेस म्हणजेच लघु कालीन कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम हे देशाच्या प्रगतीचे प्रमुख साधन ठरत आहे.या काळात प्रत्येक हाताला कौशल्य असायलाच पाहिजे असे बोलून आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचा शेवट आभार प्रदर्शनाने झाला आभार प्रदर्शन प्रांजू देशमुख यांनी केले व सर्व मान्यवराचे, अध्यक्षांचे, शिल्पनिदेशकांचे आणि विद्यार्थ्यांचे आभार मानून या कार्यक्रमाचा शेवट केला.