युवा संगम न्यूज 19/10/2025
कारंजा (घाडगे) -
अखिल भारतीय श्री.गुरुदेव सेवा मंडळ श्रीक्षेत्र गुरुकुंज आश्रम ता.तिवसा जिल्हा अमरावती अंतर्गत ग्रामगीता जीवन विकास परीक्षा.विभागाद्वारे राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या ५७ व्या पुण्यतिथी पर्वावर ग्रामगीताचार्य पदवीदान समारंभ पार पडला. सेवाधिकारी लक्ष्मण गमे, संचालक मंडळाच्या अध्यक्ष्या पुष्पाताई बोंडे ,दामोदर पाटील, प्रकाश महाराज वाघ, सरचिटणीस जनार्दन बोथे, ग्रा. जी. वि. परीक्षा विभागाचे प्रमुख गुलाब खवसे, सचिव गोपाल कडू यांच्या हस्ते वासुदेव बारंगे यांना ग्रामगीताचार्य ही पदवी प्रदान करण्यात आली.
सामुदायिक ध्यान, प्रार्थना तसेच अध्यात्मिक वारसा असलेले वासुदेव बारंगे हे सामाजिक प्रबोधन ,श्रीहरी कीर्तनाच्या माध्यमातून समाजात जनजागृतीचे कार्य करतात.त्यांना ग्रामगीतचार्य ही पदवी मिळाल्याबद्दल संभाजी ब्रिगेड कारंजा, गुरुदेव सेवा मंडळ , मराठा सेवा संघ,दादाजी महाराज आश्रम कारंजा, विनोद दंडारे, गंगाधर यावले, राजेंद्र इंगळे, डॉ. किरण भुयार, गुणवंत मुडे, प्रकाश नारिंगे, प्रा. संजय यावले, उमेश पाचपोहर, मधुसूदन डोबले आदींनी कौतुक केले. व सर्वत्र अभिनंदन होत आहे.