युवा संगम न्यूज 20/10/2025
कारंजा (घा).
कारंजा कला क्रीडा अकॅडमी, कारंजा (घाडगे) तर्फे आयोजित दिवाळीपूर्व कवी संमेलनाचे उद्घाटन आमदार सुमित वानखेडे यांचे हस्ते पार पडले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विदर्भ साहित्य संघ, नागपूर चे अध्यक्ष प्रदीप दाते प्रामुख्याने उपस्थित होत. तसेच प्रसिद्ध कवयित्री सौ. विजया मारोडकर यांची विशेष उपस्थिती होती.
कारंजा तालुक्यातील नवोदित कवी व कवयित्रींनी आपल्या सुंदर कवितांद्वारे या संमेलनाची रंगत अधिक खुलवली.
त्यामुळे साहित्यप्रेमी आणि कविश्रेष्ठांच्या सान्निध्यात आनंददायी सायंकाळ प्रेषक अनुभवत होते. कार्यक्रमाचे आयोजन विलास वानखडे यांनी केले.
कार्यक्रमाला परिसरातील मोठ्या प्रमाणात नागरिकांची उपस्थिती होती.