युवा संगम न्यूज,2/11/2025
कारंजा (घाडगे):-
कारंजा शहरात काकडा आरती ची गेल्या तीन पिढ्यापासुन असलेली परंपरा आजही सुरु आहे. कारंजा (घा) येथील वार्ड क्र. ६ रमेशरावजी भांगे याच्या घरून दि. ७/१०/२०१५ ते २/११/२०१५ कार्तिक एकादशी पर्यंत काकडा आरती सुरु असते. दादाजी महाराज मंदिर हनुमान मंदिर श्रीराम मंदिर, विळल रुक्कीणी मंदिर, श्री. संत लटारे महाराज मंदिर, दत्तात्रय मंदिर, महादेव मंदिर, लक्ष्मीनारायण मंदिर, मंदिरामध्ये पहाठे, 5 वाजतापासून काकडा आरती करण्यात येते.या काकडा आरतीला वारकरी भजन मंडळी उपस्थित राहतात. यामध्ये रमेशर भांगे, केशव जसूतकर, प्रभाकर भिलकर, नितिन मांगे, हरीभाऊ जसूतकर, सुमित बारई, दिपक जसुतकर, अनिल बगवे, विजय राऊत, विशाल चाफले, अनंता बारई, विलास बारापात्रे ,सुरज काचोळे, मारोती लोखंडे, श्रीकांत राठी, अशोक भांगे, दिनेश सरोदे ही सर्व भजन मंडळी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सांगता रमेश भांगे याच्या घरी झाली.