आमदार केचे यांच्या प्रयत्नाने आग ग्रस्तांना मदत

आमदार केचे यांच्या प्रयत्नाने आग ग्रस्तांना मदत 
युवा संगम न्यूज
28/11/2025
कारंजा (घा):-
29/4/ 2024 ला मार्केट लाइन परिसरात पहाटे अचानक आग लागून दुकाने आगीत भस्मसात झाले होते. यावेळी तत्कालीन आर्वी विधानसभा चे आमदार श्री. दादाराव केचे यांनी भेट देऊन पाहणी केली होती. व तत्काळ पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. आमदार   दादाराव केचे यांनी सभागृहात विषय लावून धरला होता.
विद्यमान विधानपरिषद आमदार दादारावजी केचे  यांच्या, प्रयत्नांना यश आले असून अजय कावडकर, मारोतराव भांगे, गजानन मानकर, अप्रित खिलोशिया या दुकानदारांना आर्थिक मदत मिळाली आहे.
कारंजा शहराचे नेते किशोर भांगे, प्रीतम भस्मे, धनराज खवशी, प्रफुल ढोकणे, सुनील वंजारी, सुमित बारई, संजय कदम, हेमराज भांगे, संदीप टिपले,रोशन मानमोडे, प्रदीप टिपले, यांनी आमदार दादाराव केचे यांचे आभार मानले.
Yuva Sangam News

Malhar Advt

Yuva Sangam News