युवा संगम न्यूज,9/12/2025
कारंजा (घा):-
कलामहोत्सवात 25 दिव्यांगानी कला सादर
चित्रपट कलाकारांची हजेरी
कारंजा घाडगे येथे 2 डिसेंबर ला जागतिक दिव्यांग दिन स्थानिक स्व. मन्नालाल मातादीन कार्यालयात साजरा करण्यात आला. यावेळी
कोणी काठीचा आधार घेऊन,तर कोणी मित्राचा हात धरून,कोणी कुबडी काखेत घेऊन तर कोणी लंगडत,कोणी आईला,तर कोणी वडिलांना,
कोणी मुलाला,तर कोणी आयोजकांना मिळेल त्या आधाराने व्यासपीठावर बसवले. एक मोठ्या आत्मविश्वासाने प्रत्येक कलाकार आपली कला सादर करत होते.हम भी कुछ कम नही हे दाखवून देत होते.
तेवढ्याच उत्साहाने सभागृहातील श्रोता वर्ग सर्वांचे जोरदार टाळ्यांच्या कडकडाटात उत्साह वाढवित होते.
आयोजकांनी उपस्थित कलाकारांचा सन्मान करण्यात करण्यात आला.
जागतिक दिव्यांग दिनाचे निमित्याने दिव्यांगांचा कला महोत्सवात तालुक्यातील विविध प्रकारच्या जवळपास 25 दिव्यांगाणी त्यांच्या अंगी असलेली कला सादर करीत आनंद घेतला.
या महोत्सवाचे उद्घाटन स्वाती विजेकर व हरेश विजेकर या रिल स्टार च्या हस्ते कवी,गझलकार,चित्रपट सहकलाकार,निर्माता,
दिग्दर्शक तसेच शब्द मराठी विश्व साहित्य संमेलन संयोजक संजय सिंगलवार यांच्या विशेष उपस्थितीत दीपप्रज्वलन करून व श्री.संत लटारे महाराज यांच्या प्रतिमापूजनाने पार पडले.
यावेळी सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष प्रेमदास मोहोड,प्रहार दिव्यांग क्रांती संघटना अध्यक्ष हरीभाऊ हिंगवे, माहिलोन्नती बहुउद्देशीय संस्था अध्यक्ष ज्योती यावले,संताजी सांस्कृतिक सेवा मंडळ उपाध्यक्ष सुदीप भांगे,GLK अपंगांची बहुउद्देशीय संस्था कारंजा चे अध्यक्ष अशोक कामडी,प्रभाकर वानखेडे,विश्वनाथ मस्के यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रास्ताविक व परिचय कला महोत्सवाचे मुख्य आयोजक व कार्यक्रमाध्यक्ष कारंजा कला क्रीडा अकादमी कारंजाचे विलास वानखडे यांनी केले.
माहिल्लोन्नतीच्या सदस्यांनी स्वागत गीत सादर केले.
सर्व पाहुण्यांचे पुष्पगुच्छ व ग्रामगीता भेट देऊन व शाल परिधान करून दिव्यांगांच्या हस्ते सत्कार करण्यात आला
तसेच कारंजा कला क्रीडा अकादमी तर्फे स्वागत साहित्य व सन्मानपत्र,प्रहार दिव्यांग क्रांती संघटना तर्फे शाल,माहिलोन्नती बहुउद्देशीय संस्थातर्फे सभागृह व्यवस्था,सुदीप भांगे मित्रपरिवार तर्फे सन्मानचिन्ह व प्रा.विजय खंगार व दिगंबर निमजे तर्फे भोजन व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली होती.गुरुदेव सेवा मंडळाचे नरेश वसुले यांनी ग्रामगीता उपलब्ध करून दिले.सूत्रसंचालन प्रिया काळे यांनी तर आभारप्रदर्शन प्रा.विजय खंगार यांनी केले.
सर्व उपस्थितांनी स्नेहभोजनाचा आनंद घेतला.