कारंजा ( घाडगे)....
गुन्हेगारी जगतातील बहुचर्चित ठरलेले येथील ड्रग्स प्रकरणामुळे कारंजा येथील पोलीस स्टेशनचे ठाणेदार महेश भोरटेकर यांची जिल्हा पोलीस अधीक्षकांनी तडकाफडकी बदली केली असून त्यांना अधीक्षक कार्यालय वर्धा येथे पाचारन करण्यात आले होते. त्यांच्या रिक्त पदावर वर्धा येथील नागेश कुमार चतरकर यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी दि. 11 गुरुवार ला येथील ठाणेदार पदाची सूत्रे स्विकारली.त्यांच्या पुढे आता येथील अवैध धंद्यावर अंकुश ठेवण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.