आईचा देहदान करून , जपलें सामाजिक दायित्व

आईचा देहदान करून , जपलें सामाजिक दायित्व
युवा संगम न्यूज,17/12/2025
कारंजा (घा):-
देहदान हेच स्रेष्ठ दान हा संतांचा संदेश मनाशी बाळगून श्री गुरुदेव प्रचारक कारंजा तालुक्यातील गोंधणी गावाचे दिव्यान्ग असलेले सामाजिक प्रबोधनकार लिलाधार धर्माजी चोपडे महाराज यांनी स्वतःच्या आईच्या मृत्यूनंतर देहदानाचा संकल्प करीत नागपूर येथील लता मंगेशकर हस्पिटल मध्ये नावाची नोंद केली होती. त्यांच्या आई गिरीजा धर्माजी चोपडे यांना वयाच्या 89 व्या वर्षी  वृद्धापकाळाने काल त्यांना देवाज्ञा झाली. त्यांनी केलेल्या निश्चयाप्रमाणे त्यांनी सदर माहिती हॉस्पिटल ला कळविली . श्री गुरुदेव राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना वंदन करीत भजन करीत टाळ मृदुनगाच्या गजरात आईचे पार्थिव शरीर दवाखानाच्या स्वाधीन केले.आपल्या सामाजिक प्रबोधनांतून लोकांना देहदानाची माहिती देणारे राष्ट्रीय प्रबोधनकार लिलाधार महाराज यांनी ही जपलेली सामाजिक बांधिलकी व करणी व कथनी सार्थ ठरवीत आईचा देहदान केल्याने त्यांचे संपूर्ण कारंजा तालुक्यात कौतुक होत आहे.
त्यांच्या आईचे पार्थिव शरीर वैद्यकीय शिक्षण आणि संशोधनासाठी दान केले आहे, जेणेकरून डॉक्टर विद्यार्थ्यांना मानवी शरीराचा सखोल अभ्यास करता येईल आणि नवीन उपचार पद्धती विकसित करता येतील. हे एक उदात्त कार्य असून, मृत्यूनंतरही समाजासाठी उपयोगी पडण्याचा हा एक मार्ग आहे. 
डॉक्टरांना शस्त्रक्रियांचा सराव करण्यासाठी आणि मानवी शरीराची रचना समजून घेण्यासाठी हा देह उपयोगी ठरणार आहे.
नवीन औषधे आणि उपचारांच्या संशोधनासाठी देहदान महत्त्वाचे ठरते.
 हे एक परोपकारी कार्य आहे, जे विज्ञानाच्या प्रगतीसाठी हातभार लावते.मृत्यूनंतर शरीराची विटंबना होते हा गैरसमज दूर करून, देहाचा उपयोग कसा होऊ शकतो हे यातून स्पष्ट होते हे मात्र खरे.
Yuva Sangam News

Malhar Advt

Yuva Sangam News