कारंजा (घा): युवा संगम न्यूज दिनांक २२/१२/२०२५
सोमवार ला आर्वी विधानसभा क्षेत्राचे आमदार सुमीत वानखेडे यांचे अथक प्रयत्नाने कारंजा (घा.) तालुक्यातील १) सारवाडी २) देववाडी ३) जसापुर ४) किन्हाळा ५) माळेगाव (काळी) ६) पांजरा (बंगला) ७) नरसिंगपूर ८) रानवाडी ९) पारडी १०) एकांबा ईत्यादी गावे गेली १० वर्षापासून दिवाणी व फौजदारी न्यायालय कारंजा (घा.) यांचे अधिकार क्षेत्रातून काढून दिवाणी व फौजदारी न्यायालय आर्वी यांचे अधिकार क्षेत्रात जोडण्यात आले होते.
त्यामुळे तालुक्यातील नागरीकांना त्रास होत असल्याने सदरची गावे ही कारंजा दिवाणी व फौजदारी न्यायालय येथे परत जोडण्यात यावी अशी मागणी कारंजा (घा.) तालुका वकील संघांने आमदार सुमीत वानखेडे यांचेकडे निवेदना द्वारे करण्यात आली होती. या संदर्भात आमदार सुमीत वानखेडे यांचे अथक प्रयत्नानंतर ही गावे पुर्ववत कारंजा दिवाणी व फौजदारी न्यायालय कारंजा (घा) ला जोडण्यात आलेली आहे. त्याबद्दल कारंजा (घा) तालुका वकील संघाचे वतीने त्यांचा शाल, ग्रामगीता देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी तालुका वकील संघाचे अध्यक्ष ॲड. पी.जी.धारपूरे, उपाध्यक्ष ॲड. जे.डी.टोपले,सचिव ॲड.डी.एम.धांदे, सहसचिव ॲड. डी.जी.टहेटवार, कोषाध्यक्ष ॲड.के.पी.नासरे, ग्रंथपाल ॲड.डी.एस.दुपारे,सल्लागार ॲड.ए. पी.पराडकर,सदस्य ॲड.आर.व्ही. मस्के, ग्रामसेवक हेटीकुंडी जगदीश हजारे, सामाजिक कार्यकर्ते पवन भक्ते आदी उपस्थित होते.