'वर्धा' जिल्ह्यावर १९२ कोटींचा(MD)'मेफेड्रोन' हल्ला

 'वर्धा' जिल्ह्यावर १९२ कोटींचा
(MD)'मेफेड्रोन' हल्ला
युवा संगम न्यूज,
10/12/2025
कारंजा (घा):-
आमदार सुमित वानखेडेंचा विधानसभेत आवाज, कठोर कारवाईची मागणी

•मेट्रो शहरातून ग्रामीण भागात वळलेले 'विष'; युवा पिढीला वाचवण्यासाठी तातडीची गरज
जी समस्या आजवर केवळ महानगरांची डोकेदुखी होती, ती 'ड्रग्ज'ची भीषणता आता महात्मा गांधींच्या विचारांचा वारसा असलेल्या वर्धा जिल्ह्याच्या ग्रामीण भागात, कारंजा (घा.) येथे येऊन ठेपल्याने मोठी खळबळ उडाली आहे. कारंजा (घा.) येथे 'डिरेक्टोरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स' (DRI) ने केलेल्या मोठ्या कार्यवाहीत, अतिशय घातक समजल्या जाणाऱ्या मेफेड्रोन (MD) या अमली पदार्थाचा तब्बल १९२ कोटी रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे. वर्धा जिल्ह्याची ओळख 'गांधी जिल्हा' आणि दारूबंदीमुळे असताना, करोडो रुपयांचे ड्रग्ज पकडले जाणे ही घटना जिल्ह्याच्या भविष्यासाठी अत्यंत गंभीर आणि चिंतेची बाब बनली आहे.
या वेळी त्यांनी स्थानिक पोलिसांवर ताशेरे ओढले.
या धक्कादायक घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आमदार सुमित वानखेडे यांनी तात्काळ हा विषय विधानसभेत उचलून धरला.  डिरेक्टोरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स द्वारे मतदारसंघातील कारंजा (घा.) येथे करण्यात आलेल्या कार्यवाहीनंतर अतिशय घातक समजल्या जाणाऱ्या मेफेड्रोन (MD) या अमली पदार्थाचा १९२ कोटीचा साठा मिळाला. याबाबत सभागृहात कठोर कारवाई करण्याची मागणी आमदार सुमित वानखेडे यांनी केली. त्यांनी सभागृहात स्पष्ट केले की, हे विष आता थेट शेतकरी पुत्रांच्या दारावर येऊन पोहोचले आहे, जे तरुण पिढीचे आयुष्य उद्ध्वस्त करू शकते.

आमदार वानखेडे यांनी याप्रकरणी प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र चिंता व्यक्त केली आणि केवळ आरोपींना पकडून न थांबता, या नशाखोरीच्या आंतरराष्ट्रीय साखळीचा मुळापासून बिमोड करण्याची मागणी सभागृहात केली आहे. "करोडो रुपयांचे ड्रग्ज बनविण्याकरिता कच्चा माल कारंजापर्यंत पोहोचणे, हे यामागे मोठे आणि संघटित रॅकेट कार्यरत असल्याचे दर्शवते. तरुण पिढीला या व्यसनाच्या विळख्यातून सुरक्षित ठेवण्यासाठी, लोकांचे आयुष्य वाचवण्यासाठी आणि गांधी जिल्ह्याची प्रतिमा जपण्यासाठी दोषींवर तातडीने कठोर कायदेशीर कारवाई करणे आवश्यक आहे," असे ते आक्रमकपणे म्हणाले.

आमदार सुमित वानखेडे यांनी दाखवलेली ही संवेदनशीलता आणि विधानसभेत जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर त्यांनी घेतलेली निर्णायक भूमिका, त्यांच्या प्रभावी नेतृत्वाला सिद्ध करते. त्यांच्या मागणीमुळे आता राज्य सरकार आणि गृह विभागावर या १९२ कोटींच्या ड्रग्ज प्रकरणाची सखोल चौकशी करून, या संकटावर नियंत्रण मिळवण्यासाठी ठोस पाऊले उचलण्याचा दबाव वाढला आहे. संपूर्ण जिल्हा त्यांच्या या प्रयत्नांचे स्वागत करत असून, पुढील कठोर कार्यवाहीकडे डोळे लावून आहे.
Yuva Sangam News

Malhar Advt

Yuva Sangam News