आज सावित्रीमाईच्या लेकींचा सन्मान सोहळा

आज सावित्रीमाईच्या लेकींचा   
सन्मान सोहळा
युवा संगम न्यूज 3/1/2026
कारंजा (घा),
•सावित्रीमाईच्या जयंतीदिनी घरकाम करणाऱ्या सावित्रीच्या लेकींचा सन्मान सोहळा
•कारंजा कला क्रीडा अकादमी व गुरुकुल स्कूल आणि माळी महासंघाचा पुढाकार
चित्रंपट दिग्दर्शक,
लोकप्रतिनिधी आणि सामाजिक लोकनेत्याची हजेरी.
कारंजा कला क्रीडा अकादमी, गुरुकुल पब्लिक स्कूल आणि माळी महासंघ कारंजा तसेच कारंजा घाडगे शहरातील दान 
दात्यांच्या सहकार्याने येत्या 3 जानेवारी 26 ला क्रांतीज्योती सावित्रीमाई जोतिबा फुले यांचे जयंती पर्वावर कारंजा शहरात स्वयंपाक,धुणी,भांडी व झाडू पोचा घरकाम करणाऱ्या सावित्रीच्या लेकींचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आर्वी विधानसभेचे आमदार सुमित वानखेडे राहणार आहे.
 उदघाटन मराठी चित्रपट यशवंत चे दिग्दर्शक,जुना फर्निचर चित्रपटाचे सहकलाकार पीयूष विजय भोंडे यांचे हस्ते लेडी गव्हर्नर प्राचार्य डॉ.कमल गवई भारताचे मा.सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या मातोश्री तसेच मिशन आय ए एस चे संचालक डॉ.प्रा.नरेशचंद्र काठोळे यांचे प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे.
या सोहळ्यात कारंजा शहरातील अनेक कुटुंबाकडे स्वयंपाक,धुणी,भांडी,झाडू,पोचा ही घरकामे करणाऱ्या जवळपास 50 सावित्रीच्या लेकींचा पुष्पगुच्छ,पुस्तक, सन्मान चिन्ह तसेच साडी चोळी भेट देऊन सन्मान करण्यात येणार आहे.
सदर सन्मान सोहळ्यात शिक्षण क्षेत्रात सेवा दिलेल्या स्वर्गीय भारती प्रकाश धारपुरे व स्वर्गीय नीलिमा राजेश जोरे स्मृतिप्रीत्यर्थ
सन्मान चिन्ह देण्यात येईल.मी सावित्री बोलतेय ही नाट्यछटा गुरुकुलतर्फे सादर केल्या जाणार आहे.माळी महासंघातर्फे अल्पोपहारची व्यवस्था तर कारंजा कला क्रीडा अकादमी तर्फे सत्कार व स्वागत व्यवस्था तसेच गुरुकुल पब्लिक स्कूलतर्फे सभागृह व बैठक व्यवस्था करण्यात येईल.
कारंजा शहरात प्रथमच होत असलेल्या घरकाम करणाऱ्या सावित्रीमाईच्या लेकीच्या सन्मान सोहळ्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी सहकुटुंब उपस्थित राहण्याचे आवाहन मुख्य आयोजक विलास वानखडे अध्यक्ष कारंजा कला क्रीडा अकादमी,अजय भोकरे सचिव गुरुकुल पब्लिक स्कूल आणि
संजय कदम माळी महासंघ कारंजा यांनी केले आहे.
Yuva Sangam News

Malhar Advt

Yuva Sangam News