कारंजा(घा):-
युवा संगम न्यूज 5/1/2026
कारंजा घाडगे येथील प्रभाग क्रमांक ६ येथील श्रद्धास्थान असलेले श्री.समर्थ दादाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त मंदिर परिसरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी आमदार सूमीत वानखेडे यांनी मंदिरात उपस्थित राहून महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. व पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. संस्थान चे अध्यक्ष प्रमोद चव्हाण यांनी आमदार सुमित वानखेडे यांना शाल व श्रीफळ देऊन त्यांचे स्वागत केले .यावेळी शिरीष भांगे,दीलीप जसुतकर,भूपेश बारंगे,उमेश तिवारी,बाबाराव बारई, प्रभाकर भिलकर,रामदास ठोंबरे,गजानन भांगे, उत्तम ठाकरे, अनिल बगवे, व परिसरातील नागरिक व भाविक भक्त मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.