पहाट पक्षी मित्रपरिवार कडून ब्लँकेट वाटप
•नागपूर तर्फे ऐन कडाक्याच्या थंडीत ब्लॅंकेट वाटप करून दिली मायेची उब
युवा संगम न्यूज,6/1/2025
कारंजा (घा):-
बुडतीया जन पाहुनीया डोळा म्हणून या कळवळा येत असे संतांच्या सदवचनाप्रमाणे, थंडीत अनेक गरजूवंत हे थंडीत कुडकुडत असताना त्यांना मायेच्या उभ देण्याचा हात पुढे केला तो नागपूर येथील पहाटपक्षी मित्र परिवाराने. संत तुकाराम म्हणायचे जे का रंजले गांजले त्याशी मने जो आपुले, तोचि साधू ओळखावा देव तेथेची जनावा आणि म्हणून अशाच गरजूवंतांमध्ये देव शोधत ठाणेगाव येथील प्रसिद्ध असलेले श्री.लक्ष्मण गिरी गोसावी देवस्थान ट्रस्ट ठाणेगाव या ठिकाणी सदर पहाट पक्षी मित्रपरिवार तर्फे गरजूवंतांना ब्लॅंकेट वाटपाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ठाणेगावच्या आजूबाजूच्या परिसरातील बोरी, हेटीकुंडी खरसखांडा मोर्शी येथिल सुद्धा अत्यंत गर्जूवंत लोकांना प्रत्यक्ष भेट देऊन सदर ब्लॅंकेट चे वाटप करण्यात आले.
यावेळी पहाट पक्षी मित्रपरिवार परिवारचे श्री मोहनराव व्याघ्र यांची उपस्थिती होती. तसेच ठाणेगाव येथील दिलीप ठाकरे, रमेश चाकोरे व दिपकर धारपुरे यांनी सदर उपक्रमाकरिता विशेष सहकार्य केले.व ठाणेगावच्या आजूबाजूच्या परिसरातील गरजूवंतांचा शोध घेऊन प्रत्यक्ष त्यांच्या घरी भेट देऊन उबदार अशा ब्लॅंकेटचे वाटप करून मायेचा हात त्यांच्या डोक्यावर ठेवला.