'सीईओं'नी जाणून घेतल्या काजळी गावातील नागरिकांच्या विविध समस्या

'सीईओं'नी जाणून घेतल्या काजळी गावातील नागरिकांच्या विविध समस्या

महिला बचत गटांना व्यवसाय वाढीसाठी केले मार्गदर्शन : मुख्यमंत्री पंचायतराज अभियान उपक्रम 
युवा संगम न्यूज 12/1/2026
कारंजा (घा):- तालुक्यातील काजळी गावात,
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत वर्धा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण यांनी दिनांक 7 डिसेंबर 2026 ला काजळी येथे भेट देऊन अभियानाची सविस्तर माहिती जाणून घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी संपूर्ण गावात फेरफटका मारत ग्रामवासीयांशी संवाद साधला. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानामध्ये काजळी  हे गाव अभियानात उत्कृष्ट कामगिरी करत असून गावातील ग्रामस्थ , कर्मचारी ,पदाधिकारी यांचे मध्ये  उत्साह निर्माण करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट प्रेरणादायी ठरली . याप्रसंगी  प्रमूख पाहूणे म्हणून अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज गोहाड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल भोसले, ग्रामपंचायतचे माजी सरपंच सरपंच सुनील  धारपुरे ,माजी उपसरपंच  प्रवीण  कोसे , गटविकास अधिकारी  प्रवीण देशमुख,  यांची प्रमुख उपस्थिती होती.मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण यांनी प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकूल बांधकाम केलेल्या लाभार्थ्यांना   घरकूल गृहप्रवेश चावी देऊन करुन घेतला. बचत गटाच्या माध्यमातून व्यवसायाला बळ देण्याकरता महिला गृह उद्योग अंतर्गत विविध गृह खाद्य  स्टॉलला मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी भेट दिली यावेळी सीआरपी गट सुद्धा उपस्थित होते.जिल्हा परिषद शाळेला भेट दिली असता शाळेतील मुलांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कौतुक केले तसेच शाळे मधील परसबागेचे निरीक्षण करून प्रशंसा केली. मुख्यमंत्री पंचायत राज अभियान अंतर्गत ग्रामपंचायत मधील काम पारदर्शकता येणे करिता ग्रामपंचायत अधिकारी  रोशन धारपुरे यांनी काजळी  गावाकरता तयार करण्यात आलेल्या नवीन वेबसाईटचे उद्घाटन  पराग सोमन  यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी वेबसाईट च्या पारदर्शकतेबद्दल प्रशंसा केली व समाधान व्यक्त केले . या वेबसाईट अंतर्गत गावातील नागरिकांना दाखल्या करता अर्ज डाऊनलोड करणे टॅक्स वसुली ऑनलाइन भरणे गावाची माहिती ऑनलाईन पाहणे ग्रामपंचायत चा  संपूर्ण जमा खर्च पाहणे काही समस्या असल्यास ऑनलाईन तक्रार करणे इत्यादी बाबी या वेबसाईट मध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे. याची संपूर्ण माहिती ग्रामपंचायत अधिकारी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे समोर इंटरॅक्टिव बोर्डवर देण्यात आले शाळेतील विद्यार्थ्यांचे विज्ञान प्रदर्शनीचे प्रयोग  पाहून सर्व अधिकारी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले अंगणवाडी मधील लहान मुलांचे भेटी दरम्यान समाधान व्यक्त केले. यानंतर महिला बचत गट चालवत असलेले गांडूळ खताला व ट्रायकोडर्मा लॅबला माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी भेट दिली व खताचे प्रोडक्शन वाढवण्याकरिता मार्गदर्शन करण्यात आले. यानंतर ग्रामपंचायत इमारत मध्ये मुख्यमंत्री पंचायतराज अभियान अंतर्गत होत असलेल्या कामाचा आढावा घेण्यात आला यामध्ये  स्पर्धेमध्ये कमी गुणांक असलेले विषयावरती चर्चा करून ते कसे वाढवण्यात येईल यावर सविस्तर चर्चा करून मार्गदर्शन करण्यात आले सदर गावाने मुख्यमंत्री पंचायतराज योजनेमध्ये चांगले काम करून स्पर्धेमध्ये नंबर आणावा अशा शुभेच्छा दिल्या जाताना  मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी थंड व शुद्ध पिण्याच्या पाण्याच्या आरोचे उद्घाटन करण्यात आले आजच्या कार्यक्रमांमध्ये जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक  राई मॅडम सहाय्यक शिक्षक  सुटे सर अंगणवाडी सेविका टोपले,  फरकाडे, महिला बचत गट सीआरपी गट ग्रामपंचायत संगणक परिचालक  लीलाधर डिग्रसे यांनी सहकार्य केले.
Yuva Sangam News

Malhar Advt

Yuva Sangam News