•स्थानिक नागरिकांनी मानले खासदार अमर काळेंचे आभार
युवा संगम न्यूज,6/1/2026
कारंजा (घा)-
येथील वॉर्ड क्रमांक -16 मधील वर्धा लोकसभा चे खासदार अमर काळे यांच्या निधीतून श्री.गोपाल कांबळे ते यावले यांच्या घरापर्यंत खडीकरण व डांबर रोड चे काम पूर्ण झाले. विशेष म्हणजे कंत्राटदार विकी भादे यांनी आज 5/1/2026 सकाळी रोड च्या कामाला सुरुवात करून सायंकाळी 5 वाजता काम पूर्ण करून दिले. व लगेच 5.30 वा.ठरलेल्या नियोजना नुसार वर्धा लोकसभा क्षेत्राचे खासदार श्री.अमर काळे यांच्या उपस्थितीत आता थांबायचं नाही, गड्या, म्हणत लोकार्पण संपन्न झाले.ज्या दिवशी रस्त्याचे कामपूर्ण त्याच दिवशी लोकार्पण होत असल्याने एकच चर्चा कारंजा शहरात होती.येथील नागरिक आतापर्यंत व्यवस्थित रस्ता नसल्याने त्रस्त होते.याची माहिती होती. म्हणून आपण निधी उपलब्ध करून देत, काम पूर्ण करण्याचा सूचना दिली. व आजच आपण लोकार्पण करत असल्याचे बोलतांना सांगितले.
यावेळी वनिता विठ्ठल भादे यांनी खासदार काळे यांनी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. व आभार मानले.या वेळी केशव चोपडे,उत्तम नारिंगे, जयसिंग घाडगे,साहेबराव चौधरी,दिलीप राठी,
,भुरुभाऊ शेख,
,गजु चाफले,दत्तू दुर्गडे,टीकाराम घागरे,मंगेश खवशी,रुपेश मस्के, टीकाराम चौधरी, निलेश भुयार,राजेश डिग्रेस,विजु ढोले,विठ्ठल भादे ,विशाल नासरे,सुनील इंगळे
,मयूर ढोले,विकि भादे
,राहुल फुले,संतोष भादे,भूषण विरुळकर,आदित्य चौधरी ,संगीता डोबले ,प्रेमिला ढोले,योगिता खवशी,वनिता खवशी,संगीता डिग्रशे,दुर्गा कांबळे इ. व
स्थानिक नागरिक, महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.