महिलोन्नतीबहुउद्देशीय संस्थे कडून सावित्रीमाई फुले जयंती साजरी

महिलोन्नती
बहुउद्देशीय संस्थे कडून सावित्रीमाई फुले जयंती साजरी 
युवा संगम न्यूज,5/1/2026
कारंजा (घा)- येथील 
श्री.समर्थ दादाजी महाराज संस्थान व महिलोन्नती बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने क्रांतीज्योती सावित्रीमाई ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.              स्त्रियांसाठी त्यांचा मान सन्मान अभिमान असलेल्या सावित्रीमाई ज्योतिबा फुले यांची 3 जानेवारीला जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली श्री.समर्थ दादाजी महाराज संस्थांचे अध्यक्ष किरण भुयार व त्यांच्या कमिटीने पूर्ण कार्यक्रमाची तयारी केली होती.महिलोन्नती बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्षा सौ.ज्योती गंगाधर यावले यांनी आपल्या भाषणातून सावित्रीबाई होत्या म्हणून मी इथे आहे परंतु स्त्रीच्या यशस्वीतेमध्ये पुरुषाचा तेवढाच वाटा असतो ज्योतिबांनी जर सावित्रीमाईंना साथ दिली नसती तर सावित्रीबाईंनी स्त्रियांना एवढे इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिण्यात आलेले कार्य करू शकल्या नसत्या म्हणून प्रत्येक पुरुषाने आपल्या पत्नीच्या पाठीशी खंबीर उभे राहावं आणि प्रत्येक स्त्रीचा सन्मान करावा.      महिलोन्नती बहुउद्देशीय संस्थेमार्फत कार्यक्रमाला उपस्थित महिलांना गिफ्ट वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला उपस्थित श्री. समर्थ दादाजी महाराज संस्थान कमिटी, ग्रामगीताचार्य, महिलोन्नतीच्या अध्यक्ष सौ ज्योती गंगाधर यावले. सावित्री माई वर गीत अंजली इंगळे,सविता यावले,सौ चाफले , यांनी सादर केले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विनोद दंडारे  यांनी केले. नागरिकांची कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
Yuva Sangam News

Malhar Advt

Yuva Sangam News