कारंजा (घा):-
युवा संगम न्यूज,4/2/2026
महीलोन्नती बहुउद्देशीय संस्था कारंजा (घाडगे) यांच्या अंतर्गत महिलोन्नती महिला मंच द्वारे कारंजा (घा) येथे महिलांकरिता सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते. या कार्यक्रमाला उद्घाटक ॲड.शितल पंकज भोयर तर प्रमुख पाहुणे म्हणून सौ. सरीता गाखरे, सौ वैशाली ऐरावर, सौ. जयश्री गफाट, सौ रजनी मानमोडे , सौ.योगिता कदम, सौ रमा दुर्गे, सौ वैशाली सरोदे, सौ. सुवर्णा कावडकर सौ. सोनाली भांगे सौ. निर्मिला भोकरे, सौ सावित्री वेरूळकर सौ. चित्रा काळे, सौ. सुवर्णा कळसकर, सौ. प्रतिभा टुले, सौ. सविता यावले, सौ. अनिता चन्नोटे हे उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ. ज्योती यावले यांनी भुषविले. उद्घाटन मार्गदर्शनात ग्रामीण भागातील महिलांचा सर्वांगीण विकास व्हावा त्यांना एक हक्काच व्यासपीठ निर्माण होणे ही काळाची गरज आहे. चूल आणि फोन ही संकल्पना बाजूला ठेवून आपल्या सर्वांगीण विकासासोबतच आपल्या कुटुंबाचा विकास रोजगार
त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून मोलाचा सल्ला दिला.महिला हे एकटी नसून ती संपूर्ण कुटुंबाचा उद्धार करणारी आहे. आजची स्त्री या धकाधकीच्या जीवनामध्ये कुठेही कमी पडता कामा नये तिने आपल्या या सर्वांगीण विकासाकरिता एक पाऊल पुढेच असलं पाहिजे जेणेकरून कुटुंब, समाज, गाव, राज्य आणि देश हे प्रगती पथाला जाईल आणि या माध्यमातूनच आपल्या देशाचा सुद्धा विकास होईल अशा आपल्या उद्घाटनीय भाषणात शितल पंकज भोयर बोलत होत्या. शितल भोयर यांचा कारंजा शहरात प्रथमच आगमनानिमीत्त गुरूदेव सेवकांच्या वतीने शाल व ग्रामगीता देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे संचालन सौ संगीता कामडी, सौ. शोभना मस्के यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार सौ.शुभांगी मरघडे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेकरीता संस्थेच्या उपाध्यक्ष सौ. प्रिया श्याम काळे, निलेश देशपांडे, प्राची काळबांडे , दिव्यानी सरोदे यांनी परीश्रम घेतले.