युवा संगम न्यूज 27/02/2026
कारंजा(घा):-
तालुक्यातील सावरडोह गावात दारूचा मोठ्या प्रमाणात महापूर सुरु असून गावकरी यामुळे त्रस्त झाले आहे. त्यामुळे आज दी. 27 शुक्रवार ला ग्रामपंचायत सावरडोह येथील सरपंच निलेश मरसकोल्हे यांच्या नेतृत्वात येथील नागरिकांनी कारंजा पोलीस स्टेशन वर धडक देत कठोर कारवाई ची निवेदनातून मागणी केली.
अवैध दारूचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालू असून गावातील तसेच गावाबाहेरील दारू विक्रते व पुरवठादार गावात दारू विक्री करतात त्यामुळे युवापिढी दारूच्या आहारी जात आहे तसेच शालेय विद्यार्थी यांचेवर याचा वाईट परिणाम होत असून त्यांचे शैक्षनीक जिवण धोक्यात आले आहे. गावात दारू पिण्याऱ्यामुळे तंट्यांचे प्रमाण खुप वाढले आहे. यामुळे गावातील सलोख्याचे वातावरण खराब झाले आहे. सदर दारू विक्रेत्यावर आळा घालन्याकरीता वारंवार कारंजा पोलीस स्टेशन ला मदत मागितली पण पाहीजे त्या प्रमाणात सहकार्य मिळत नसल्याचा गावाकर्यांचा आरोप आहे. गावातील पोलीस पाटील अवैध धंदे करणार्यांना अभय देत असल्याचा आरोपही गावकर्यांनी केला आहे. बाहेरगांव वरून दारूडे गावात येऊन झगडे करतात व शिवीगाळ करत असल्यामुळे सामान्य नागरिकांना जीवन जगणे येथे कठीण झाले आहे. पोलीस पाटील बघ्याची भूमिका घेत असल्याने अवैध दारूचे धंदे बंद करण्याकरीता कार्यवाही करण्यात यावी.अशी विनंती गावकर्यांनी निवेदनातून केली आहे. या निवेदनाची प्रत पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी यांनाही पाठविण्यात आली आहे.यावेळी
राजेश गोवर्धन गाडरे,
मंगेश ज्ञानेश्वर धडाळे,
राहूल सुदामराव मोहिते,
मनिषा राजेद्र मोहिते,
वामन लक्ष्मण धुर्वे तंटामुक्ती अध्यक्ष,निलेश बाबाराव मरस्कोल्हे सरपंच, कुणाल रजितराव धुर्वे , आदीं उपस्थित होते