आमदार सुमित वानखेडेकडून प्रज्वल नासरेचा सत्कार

आमदार सुमित वानखेडेकडून प्रज्वल नासरेचा सत्कार 
युवा संगम न्यूज,08/3/2026
कारंजा (घा)-
 आर्वी विधानसभा क्षेत्रातील ठाणेगाव येथील प्रज्वल धनराज नासरे यांनी लोक सेवा आयोग परीक्षेत 677 वी रँक प्राप्त केल्याबद्दल आर्वी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार सुमित वानखेडे यांनी शाल श्रीफळ देऊन सत्कार करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.  कारंजा तालुक्यातील ठाणेगाव येथील सर्व सामान्य कुटुंबात राहणाऱ्या प्रज्वलने लोक सेवा आयोग परीक्षेत उत्तीर्ण करून यशस्वी झेप घेतली. वडील अल्पभूधारक शेतकरी,किराणा व्यावसायिक अशा सर्वसाधारण परिस्थितीतुन प्रज्वलने नवोदय विद्यालय शिक्षण घेत बिए शिक्षण पूर्ण केले. सन 2025मध्ये राज्यशास्त्र विषयात  पदवी मिळवली. यानंतर लगेच त्याने स्पर्धा परीक्षेची तयारी करत प्रशासकीय सेवा परीक्षा देण्यात सुरवात केली. प्रज्वलची जिद्द चिकाटी व अभ्यासवृत्ती मुळे कुठेही खाजगी शिक्षण न घेता त्याने ध्येय प्राप्त केले. ठानेगाव जगदंबा मंदिर परिसरात आमदार आपल्या दारी या कार्यक्रम मध्ये प्रज्वल धनराज नासरे यांचे विशेष अभिनंदन केले.सर्वासामान्य कुटुंबातुन येऊन आपल्या जिद्दीच्या भरोवशावर यश प्राप्त केले. या यशाबद्दल जिल्ह्यात सर्वत्र कौतुक होत आहे.आमदार सुमित वानखेडे यांनी प्रज्वल नासरे यांचे सत्कार केले यावेळी उपविभाग अधिकारी विश्वास सिरसाट, तहसीलदार अनिल निनावे, प्रशांत वानखेडे, चक्रधर डोंगरे,सरिता गाखरे, नीता गजाम, रेवता धोटे, सुरेश खवशी, शिरीष भांगे,जगदीश डोळे, पुष्पा चरडे, भूपेश बारंगे, दिलीप जसूतकर, विनायक भांगे, रोशन चौधरी,जीवन चरडे, देवेंद्र नासरे यांनी अभिनंदन केले.
Yuva Sangam News

Malhar Advt

Yuva Sangam News