कारंजा (घा):-
युवा संगम न्यूज 29/03/2026
कारंजा
एम.डी.प्रकरणाच्या कारवाई नंतर काही काळ बंद असलेल्या शहरातील अवैध व्यवसायाला पुन्हा उधाण आले असून वर्धा प्रशासनाच्या आशीर्वादाने हे व्यवसाय सुरू असून स्थानिक पोलिस प्रशासनाने मात्र बघ्याची भूमिका घेतल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे. धंद्यांचे प्रमाण झपाट्याने वाढत असल्याची गंभीर बाब समोर येत आहे. शहरातील विविध भागांमध्ये नियमबाह्य पद्धतीने चालणारे व्यवसाय, बेकायदेशीर व्यवहार आणि परवानगीशिवाय सुरू असलेले उपक्रम यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
स्थानिक नागरिकांच्या मते,अवैध मद्यविक्री ईतर अनधिकृत व्यवसाय खुलेआम सुरू आहेत. यामुळे परिसरातील कायदा व सुव्यवस्थेवर परिणाम होत असून, तरुण पिढीवरही त्याचा विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
विशेषतः निवासी भागालगत अवैध धंदे वाढल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अनेक वेळा तक्रारी करूनही अपेक्षित कारवाई होत नसल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, काही सामाजिक संघटना आणि जागरूक नागरिकांनी प्रशासनाकडे मौखिक सूचना देऊन तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. पोलीस प्रशासन आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी संयुक्तपणे मोहीम राबवून अशा अवैध धंद्यांवर लगाम लावावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
स्थानिक पोलीस प्रशासन यांच्या संगम मताने सदर व्यवसाय सुरु असल्याची चर्चा शहरात सुरु आहे. तसेच
कारंजा शहरातील वाढते अवैध धंदे ही केवळ कायद्याची समस्या नसून सामाजिक आरोग्याचीही बाब आहे. यावर तातडीने आणि ठोस पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.अन्यथा जनतेत मोठया प्रमाणात आक्रोश निर्माण होऊ शकतो. कारंजा तालुक्यात सध्या अवैध दारू पुरवठा वाढत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगू लागली आहे. विशेषतः काही ठिकाणी बाहेरील भागातून दारू आणून विक्री केली जात असल्याचे सांगितले जात आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, कोंढाळी परिसरातून काही व्यक्तींमार्फत कारंजा तालुक्यात दारू पुरवठा मोठ्या प्रमाणात होत आहे. व मोबाईल कॉल वर घरपोच दारू पुरवठा करणारी युवकांची टोळी सक्रिय झाली आहे. पोलिसांनी कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.