१ कोटींच्या नमो उद्यानाची विशेष तरतूद - २ स्मशानभूमीचाही समावेश
युवा संगम न्यूज,26/4/2026
कारंजा (घा) - कारंजा शहरात नगरपंचायतच्या वतीने महत्वाच्या व बहुचर्चित नमो उद्यान व शहरातील प्रमुख २ स्मशानभूमीचे भूमिपूजन संपन्न 25एप्रिल ला सायंकाळी संपन्न झाले.राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील सर्व नगरपंचायत व नगरपरिषद यांना नमो उद्यान करीता १ कोटी रु विशेष तरतूद करण्यात आली होती . त्याच योजने अंतर्गत मा सुमितभाऊ वानखडे , विधानसभा सदस्य यांच्या प्रमुख सहकार्याने व स्थानिक नेते नितीन दर्यापूरकर व सर्व पदाधिकारी यांच्या विशेष प्रयत्नाने वॉर्ड क्र. ८ येथे नमो गार्डन करिता १ कोटींचा निधी मंजूर झाला. व शहरातील प्रमुख वॉर्ड क्र १ व १५ येथील स्मशानभूमीचे कार्यासाठी ऐकून १ कोटी निधी मंजूर करून भूमिपूजन संपन्न झाले . निमित्याने वर्धा जिल्हा शिवसेना प्रमुख बाळा शहागालकर , शिवसेना आर्वी विधानसभा प्रमुख नितीन दर्यापुरकर ,नगराध्यक्षा सौ.स्वाती भिलकर , उपनगराध्यक्ष भगवान बुवाडे , नगरसेवक संजय मस्के , विशाळ इंगळे , राजेंद्र लाडके, कमलेश कठाने , निता मिश्रा , माधुरी दुधकवरे,रंजना ढबाले , जेष्ठ नागरिक अजाबराव भोकरे ,अनिल जैस्वाल, प्रल्हाद मोटवानी,अरुण पालिवाल , ,प्रवीण देशमुख , उत्तमज नारिंगे, अनिल नांदणे , योगेश चौधरी , सुजित चौधरी , गजानन भिलकर ,मनोज चरडे ,मनीष चेर , सतीश इंगळे , कैलास अग्रवाल, अमित बंडे , सुरज तायवाडे इ. मान्यवर व महिला व नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.