सुवर्णा चौधरी यांची गुरुकुल पब्लिक स्कूलला भेट

सुवर्णा चौधरी यांची गुरुकुल पब्लिक स्कूलला भेट
•विद्यार्थ्यांचे केलं कौतुक 
युवा संगम न्यूज 14/5/2026
कारंजा(घा):---
  महिला आघाडी अध्यक्षा भाजपा
आर्वी विधानसभा प्रमुख सुवर्णा चौधरी आणि गुरुकुल पब्लिक स्कूलचे इतर महिला पालक यांनी शाळेमध्ये येऊन गुरुकुल पब्लिक स्कूलचा दहावी बोर्डाचा उकृष्ट निकाल लागल्याबद्दल आणि वर्धा जिल्ह्यातून या शाळेचा विद्यार्थी सृजल विनोद जाधव हा 98.80% घेऊन प्रथम आला. संपूर्ण कारंजा तालुक्याचे नाव प्रथमच जिल्ह्याच्या यादीमध्ये झळकविले त्याबद्दल,या सर्व मान्यवरांनी संस्थेचे अध्यक्ष  शरद बोके, शाळेचे मुख्याध्यापक आशिष मानकर आणि शाळेतील इतर शिक्षक यांचा शाळेमध्ये येऊन शॉल, पुष्पगुच्छ आणि महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा देऊन सन्मान केला. आणि शाळेतील संपूर्ण शिक्षकांचे आणि संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे  अभिनंदन केले. गुरुकुल पब्लिक स्कूल उत्तरोत्तर अशीच प्रगती करीत राहील  ही अपेक्षा व्यक्त केली. गुरुकुल पब्लिक स्कूलने कारंजा तालुक्याचे नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झळकावेत याबद्दल शाळेला शुभेच्छा दिल्या. यावेळी शिक्षक/शिक्षिका उपस्थित होते.
Yuva Sangam News

Malhar Advt

Yuva Sangam News