आ.वानखेडे यांचा विकास कामांचा धडाका

आ.वानखेडे यांचा विकास कामांचा धडाका
•२ कोटी ७९ लाखाच्या विकास कामांचा शुभारंभ 
•जलसंधारण आणि रस्ते विकासातून साधणार शेतकर्‍यांची समृद्धी
युवा संगम न्यूज,16/5/2026
कारंजा (घा):-आर्वी विधानसभा मतदार संघ विकासाच्या बाबतीत कुठेच मागे राहता कामा नये यासाठी आमदार सुमित वानखेडे सातत्याने प्रयत्नशील असतात. आपल्या कौशल्याचा पुरेपुर वापर करीत प्रत्येक क्षेत्रातील कामं पुर्णत्वास नेण्याचा मानस आमदार सुमित वानखेडे यांचा आहे. ग्रामीण भागाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या बळीराजाला सक्षम करण्यासाठी आमदार सुमित वानखेडे यांनी कंबर कसली असून गाळमुक्त तलाव व गाळयुक्त शिवार’ अभियानांतर्गत कारंजा तालुक्यात २ कोटी ७९ लाखांच्या विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला. 
केवळ कागदावर योजना न आखता प्रत्यक्ष कृतीवर भर देत, आमदार वानखेडे यांनी तालुक्यातील जलसंधारण आणि रस्ते विकासासाठी तब्बल २ कोटी ७९ लाख रुपयांचा निधी खेचून आणला आहे.
या अभियानांतर्गत माळेगाव (काळी), आजनादेवी, बेलगाव आणि आजनडोह येथे लघु सिंचन तलाव खोलीकरणाची कामे, तर गवंडी, मोर्शी आणि बांगडापूर येथे गाव तलाव खोलीकरणाची कामे युद्धपातळीवर सुरू करण्यात आली आहेत. राहटी व सुसुंद येथे पाझर तलाव खोलीकरण आणि सेलगाव (ल.) येथे कार नदी प्रकल्पातील गाळ उपसा कामांचे भूमिपूजन करण्यात आले. या तलावांमधील सुपीक गाळ थेट शेतकर्‍यांच्या शेतात पोहोचणार असल्याने जमिनीचा पोत सुधारेल आणि रासायनिक खतांच्या खर्चात मोठी बचत होऊन उत्पादन वाढेल. जलसंधारणासोबतच दळणवळण सुलभ करण्यासाठी कारंजा-धावडी रस्ता दुरुस्ती, खरसखांडा-हेटीकुंडी रस्ता दुरुस्ती आणि काजळी-राहटी रस्ता सुधारणा ही महत्त्वपूर्ण कामे मार्गी लावली आहेत.

शेतकरी सुखी तर जग सुखी या ब्रीदवायाला जागत, शेतकर्‍यांच्या घामाला दाम आणि शेतीला पाणी मिळावे यासाठी अहोरात्र झटणारे शेतकर्‍यांचे कैवारी म्हणून आमदार सुमित वानखेडे यांची जनमानसात प्रतिमा उंचावत आहे. या विविध कामांच्या शुभारंभ प्रसंगी कारंजा, माळेगाव (काळी), आजनादेवी, बेलगाव, सेलगाव (ल.), कारंजा, धावडी, गवंडी, मोर्शी, खरसखांडा, हेटीकुंडी, आजनडोह, बांगडापूर, काजळी, राहटी आणि सुसुंद येथील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासह परीसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या विकासकामांच्या धडाक्यामुळे संपूर्ण तालुक्यात आनंदाचे वातावरण आहे.
Yuva Sangam News

Malhar Advt

Yuva Sangam News